T20 world cup – टीम इंडियात मोठा बदल, या मुंबईकर खेळाडूला मिळाली संधी

आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना एक मराठमोळ्या खेळाडूला संघात संधी मिळाली आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूरची अखेरच्या पंधरामध्ये वर्णी लागली आहे.

शार्दुल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर आता आयपीएलमध्येही तो चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आक्रमत फलंदाजी व गोलंदाजी असा अष्टपैलू खेळ खेळणाऱ्या शार्दुलला संघात जागा मिळाली आहे. आधी जो संघ जाहीर झाला होता त्यात अक्षरला स्टँडबायवर ठेवण्यात आले होते. मात्र आज त्याची संघात निवड झाली आहे.

वर्ल्डकप खेळणारे 10 खेळाडू IPL मधून बाहेर, 6 जणांच्या ‘फ्लॉप शो’मुळे चिंता वाढली

आगामी टी-20 वर्ल्डकपची तयारी म्हणून यूएईंमध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगकडे पाहिले जात होते. या लीगमधील 60 पैकी 58 सामने संपले असून 15 तारखेला अंतिम सामना रंगणार आहे. वर्ल्डकपसाठी निवड झालेले 10 खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. यातील सहा खेळाडूंची कामगिरी खूपच खराब राहिली आहे, तर चार जणांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे.

हार्दिक आणि ईशान फेल

टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसची चिंता कायम आहे. आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केलेली नाही. तसेच फलंदाजीमध्ये त्याने 12 लढतीत 14 च्या सरासरीने 127 धावाच केल्या. तर गेल्या मोसमात त्याने 35 च्या सरासरीने 281 धावा केल्या होत्या. दुसरीकडे ईशान किशनही यंदा फ्लॉप राहिला. त्याने 10 लढतचीत 241 धावे केल्या. गेल्या मोसमात त्याने 14 लढतीत 57 च्या सरासरीने 516 धावा केल्या होत्या.

चहर-भुवनेश्वरने चिंता वाढवली

मुंबईचा फिरकी गोलंदाज राहुल चहरने 11 लढतीत 13 बळी घेतले. तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने 11 लढतीत फक्त 6 बळी मिळवले. दोघांच्याही खराब कामगिरीमुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे

आपली प्रतिक्रिया द्या