‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये ही सुंदर अभिनेत्री साकारणार छत्रपतींच्या पत्नीची भूमिका

3547

हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रटातील काही पात्रांची ओळख याआधीच करून देण्यात आली आहे. आता चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार हे देखील स्पष्ट झाले आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडला होता. अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण हा तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल व सैफ अली खानही दिसणार आहेत.

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये मराठी अभिनेता शरद केळकर दिसणार आहे, तर बोल्ड मॉडेल व अभिनेत्री इलाक्षी गुप्ता ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची भूमिका साकारणार आहे.

elakshi-gupta-tanhaji

इलाक्षी गुप्ता हिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. याआधी तिने मॉडेलिंगसह प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच 2015 साली ‘मिसेस इंडिया ग्लोब’ हा किताब तिने मिळवला होता.

शिवाजी नाही ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणा, शरद केळकरचा व्हिडीओ व्हायरल

आपली प्रतिक्रिया द्या