‘तो’ व्हिडीओ प्रसिद्ध झाला तर माझी पंचाईत होईल! तापसी पन्नू

1341

सांड की आँख चित्रपटाची अभिनेत्री तापसी पन्नू हिला नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. नेहा धुपियाने तापसीला तिच्या आय़ुष्यातील सगळ्यात लाजिरवाणा प्रसंग कोणता असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला तापसीने मनमोकळेपणाने उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तरदेताना ती म्हणाली की जर त्या प्रसंगाचं हॉटेलमधलं चित्रीकरण जगापुढे आलं तर माझी जाम पंचाईत होईल.

हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये तापसी राहायला होती. या हॉटेलमध्ये एक पाण्याचं कारंजे होते. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला टॉयलेट होतं. तापसीला टॉयलेटला जायचं होतं. कारंजाला वळसा घालून जायला तिला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने एक प्लॅन ठरवला. ती कारंजाच्या एका काठावर उभी राहिली. दुसऱ्या काठावर उडी मारायची आणि मग टॉयलेटला जायचं असं तिने ठरवलं होतं. तापसीने आत्मविश्वासाने उडी मारली, मात्र तिचा अंदाज चुकला आणि तिचा पाय घसरला. पुढे काही कळायच्या आत तापसी पाण्यामध्ये उताणी पडली. तापसीने टीशर्ट पायजामा घातलेला होता आणि तो पूर्णपणे ओला झाला होता असं तिने सांगितलं.

तापसीने म्हटलं की हे इथेच संपलं नाही. कारंजाच्या बाजूला टेबल खुर्च्या होत्या. या खुर्च्यांवर दोन माणसं बोलत बसली होती. त्यांनी मला पाण्यामध्ये पडताना पाहिलं होतं. मला हात देऊन उठवण्याऐवजी ते आश्चर्यचकीत होऊन माझ्याकडे नुसते बघत राहिले असं तापसीने सांगितलं आहे. मी असा आचरटपणा का केला आणि मी पाण्यात कशी पडले असे दोन प्रश्न त्यांच्य चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

आपली प्रतिक्रिया द्या