तारक मेहता..ला झटका, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा मालिकेला रामराम

3944

तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय हिंदी मालिकेच्या मागची संकटं थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. या मालिकेतील कलाकार एका पाठोपाठ एक मालिका सोडताना दिसत आहेत. आता या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही मालिकेला रामराम ठोकला आहे.

तारक मेहता.. या मालिकेतून आधी टप्पू ही भूमिका करणारा भव्य गांधी याने मालिका सोडली होती. निर्माते आपल्या व्यक्तिरेखेकडे फारसे लक्ष देत नसल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानंतर सोनू ही भूमिका करणाऱ्या निधी भानुशाली हिनेही ही मालिका सोडली होती. त्यात भरीस भर म्हणून गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ दयाबेन हे पात्र साकारणारी दिशा वकानीही शोमध्ये दिसलेली नाही. तिच्या शोमध्ये परत येण्याची आशा निर्माण झाली होती, मात्र अद्याप त्याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे भविष्यात तीही मालिका सोडू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

bawari-bagha

त्यातच आता या मालिकेत बावरी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मोनिका भदोरिया या अभिनेत्रीने ही मालिका सोडली आहे. स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मोनिका भदोरिया तिला मिळणाऱ्या वेतन श्रेणीवर खूश नव्हती. तिला तिचं मानधन वाढवून हवं होतं. त्यासंबंधी तिने निर्मात्यांशी बोलणीही केली होती. मात्र, निर्मात्यांनी त्याला नकार दिल्याने तिने शो सोडायचा निर्णय घेतला आहे. निर्माते पैसे वाढवून देणार असतील तर तिची शोमध्ये पुन्हा येण्याची तयारी असल्याचंही तिने बोलून दाखवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या