जातीवाचक शब्द उच्चारल्याने ‘बबिता’ अडचणीत

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता हे पात्र लोकप्रिय झालं आहे. बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता ही हिंदी मालिकाक्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा बनली आहे. हीच मुनमुन दत्ता सध्या लोकांच्या टीकेची धनी बनली आहे.

mm3

एका व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्द उच्चारल्याने मागासवर्गीय समाजातील लोकं तिच्यावर नाराज झाली आहेत. हंसराज मीणा नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने मुनमुनचा व्हिडीओ ट्विट करत तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

जो व्हिडीओ हंसराज याने ट्विट केला आहे त्यामध्ये मुनमुनने म्हटलंय की ” मी युट्युबवर येणार असून मी व्हिडीओंमध्ये चांगली दिसायला हवी, *गी दिसायला नको .” वाद वाढत चालल्याचे दिसल्याने मुनमुन दत्ताने ट्विटरद्वारे माफी मागितली असून तिने आपल्याकडून या शब्दाचा अजाणतेपणी वापर केल्याचे म्हटले आहे.

mm2

हा शब्द वापरून कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या असं मुनमुनने म्हटलं आहे. मुनमुनने तिच्या स्पष्टीकरणात म्हटलंय की भाषेच्या अडचणीमुळे तिच्याकडून ही चूक झाली आहे. जो शब्द मला सांगण्यात आला होता, त्याचा मला अर्थ माहिती नव्हता असं मुनमुनने म्हटलं आहे.

महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाबाबत हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने सोशल मीडियावर #MeToo नावाचे कॅम्पेन सुरू केल्यानंतर जगभरातील हजारो स्त्रियांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाला वाचा फोडली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या हिंदी मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता हिने देखील आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाची आपबीती इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून जगासमोर मांडली होती.

mm1

मुनमुनने #MeToo हा हॅशटॅग वापरत लिहिले होते की, ‘मी पाहात आहे की #MeToo हॅशटॅग वापरून महिलांनी सांगितलेल्या आपबीतीमुळे पुरूष त्रस्त झाले आहेत. मात्र त्रस्त होऊ नका हे तुमच्या आजूबाजूलाही होत आहे. तुमच्या घरात, बहिणीसोबत, मुलीसोबत, आईसोबत आणि पत्नीसोबतही होत आहे. एवढेच नाही तर तुमच्या नोकराणीसोबतही होत आहे. कधी त्यांच्यावरही भरोसा ठेऊन याबाबत चौकशी करा. त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच त्रस्त करणारे असेल.’

mm4

मुनमुन पुढे लिहिले होते की, ‘मी तुम्हाला माझ्या लहानपणीची गोष्ट सांगत आहे. ही गोष्ट सांगताना देखील माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. माझ्या शेजारी राहणारे काका मला मुद्दाम जोरदार मिठी मारत होते आणि मी ही गोष्ट कोणाला सांगू नये म्हणून मला धमकी देत होते. माझ्यापेक्षा मोठे असणारी मामाची मुलं अश्लील इशारे करायची. माझ्या जन्माच्या वेळी रुग्णालयात येऊन मला पाहणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीने मी 13 वर्षाची झाल्यानंतर अश्लिल पद्धतीने हात लावले होते. कारण त्याला वाटत होते की मी आता मोठी झाली आहे आणि ‘तशा’ पद्धतीने हात लावणेच तो योग्य समजत होता.’

mm5

‘मी क्लासला जात होते त्या ठिकाणी असणारे माझ्या शिक्षक माझ्या अंतर्वस्त्रात हात घालत होता. माझे दुसरे एक शिक्षक ज्यांना मी राखी बांधत होते ते भर वर्गात मुलींची ब्रा ओढून त्यांना ओरडायचे किंवा त्यांच्या वक्ष स्थळावर चापट मारायचे. हे सर्व का होते? कारण तुम्ही लहान असतात आणि त्याविरोधात बोलण्याची तुमची हिंमत नसते. तुम्हाला हे नाही कळत की ‘त्याच्या’ अश्लील चाळ्यांची माहिती आई-वडिलांना कशी द्यावी. मात्र यानंतर पुरूषांविषयी एक प्रकारचा तिरस्कार उत्पन्न होतो.’ अशा प्रकारची पोस्ट करत मुनमुनने आपल्यासोबत लहाणपणी झालेल्या लैंगिक छळाला वाचा फोडली होती.

आपली प्रतिक्रिया द्या