‘तारक मेहता का…’ मधून दिशा वकानीचा पत्ता कट? ‘ही’ अभिनेत्री दयाबेन साकारणार असल्याची चर्चा

टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Ooltah Chashma) या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या दयाबेन अर्थात दिशा वकानी (Disha Vakani) हिचा पत्ता या मालिकेतून कट झाल्याची चर्चा सुरू आहे. दिशा वकानी गेल्या काही काळापासून या मालिकेपासून लांब असून तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न काही काळापासून सुरू आहे. मात्र आता ही भूमिका ‘ये हैं मोहब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठी दहिया (Divyanka Tripathi Dahiya) हिला ऑफर करण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, दिव्यांका त्रिपाठी दहिया हिला सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील दयाबेन हिची भूमिका ऑफर करण्यात आली. मात्र तिने ही ऑफर रिजेक्ट केली. अर्थात याबाबत दिव्यांका हिच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दरम्यान, दिशा वकानी हिने बाळांतपण आणि संगोपन यासाठी या प्रसिद्ध मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र बऱ्याच काळानंतरही ती मालिकेमध्ये दिसली नाही. दयाबेन हिच्याशिवाय या मालिकेचे चित्रिकरण सुरू आहे. या दरम्यान दिशा वकानी हिने पुन्हा कमबॅक करावे यासाठी निर्मात्यांनीही कंबर कसली. परंतु अद्यापही त्यांना यश मिळालेले नाही.

लोकप्रिय भूमिका

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Ooltah Chashma) ही मालिका गोकुलधाम सोसायटी आणि गडा फॅमिलीच्या अवतीभोवती फिरते. दयाबेन आणि जेठालाल हे यातील प्रमुख पात्र आहेत. दयाबेन हिच्या बोलण्याचा अंदाज प्रेक्षकांना आवडतो. मात्र तीच या मालिकेतून बाहेर असून प्रेक्षकही ती कधी पुनरागमन करते याची वाट पहात आहेत.

…म्हणून नकार?

दरम्यान, दिव्यांका त्रिपाठी ही रिअॅलिटी शो खतरो के खिलाडी सिझन 11 मध्ये दिसणार आहे. या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये ती बिझी असल्यानेच तिने दयाबेन हिची भूमिका साकारण्यास सध्या नकार दिला असल्याचे चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या