‘हा’ अभिनेता साकारणार ‘डॉ. हाथी’, तारक मेहतामध्ये नवी एन्ट्री

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारण्यासाठी आता नवा कलाकार पाहायला मिळणार आहे. निर्मल सोनी हे डॉ. हाथीची भूमिका साकारणार असल्याची माहिती एका खासगी वेबसाईटनं प्रसिद्ध केली आहे.

nirmal-soni-new

अभिनेते कवी कुमार आझाद यांच्या निधनाने प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण ‘शो मस्ट गो ऑन…’ याप्रमाणे ही मालिका सुरू असून आता डॉ. हाथी या भूमिकेत निर्मल सोनी दिसणार आहेत. खरंतर कवी कुमार आझाद यांच्या आधी निर्मल सोनीच ही भूमिका साकारत होते. मात्र काही खासगी कारणांनी त्यांनी मालिका सोडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते या मालिकेत एन्ट्री करत आहेत. १३ सप्टेंबर म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते या मालिकेत झळकण्याची शक्यता आहे. गोकुळधाममध्ये गणेशोत्सवाची धूम असलेत त्यातच नवे डॉ. हाथी दिसतील.