फक्त 3 रुपयात 24 तास काम करायचे, ‘तारक मेहता का…’ मालिकेमुळे कलाकाराचे आयुष्य बदलले

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आबाल-वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच ही मालिका गेल्या 12 वर्षापासन टीआरपीच्या रेसमध्येही टिकून आहे. या मालिकेमध्ये काम करणारे कलाकारांनाही यामुळे प्रेक्षकांचे प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. जेठालालपासून बागापर्यंत सर्वांनाच या मालिकेमध्ये वेगळी ओळख मिळवून दिली.

बागासोबत दिसणारे नट्टू काका यांचेही आयुष्य या मालिकेमुळेच बदलले. ‘नट्टू काका’ यांचे नाव घनश्याम नायक आहे. मात्र आजही ते कुठेही दिसले तरी लोक त्यांना नट्टू काका याच नावाने हाक मारतात. गेल्या 55 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असणाऱ्या नट्टू यांचा संघर्ष वाखाणण्याजोगा आहे.

घनश्याम नायक यांनी जवळपास 350 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. यात हिंदी मालिकांसह अन्य भाषांमधील मालिकांचाही समावेश आहे. तसेच त्यांनी बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे. सलमान खान याच्या ‘हम दिल दे चुके सनम’, ‘तेरे नाम’ यासारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे. तसेच चोरी चोरी’ आणि ‘खाकी’ या चित्रपटातही त्यांची छोटी भूमिका होती. तसेच नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मासूम’ या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणूनही काम केले होते.

एका मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील आपला संघर्ष उघड केला होता. एकेकाळी मी फक्त 3 रुपयांमध्ये 24 तास काम करायचो. त्याकाळी इंडस्ट्रीमध्ये कामाचे जास्त पैसे मिळत नव्हते. पण मला कलाकारच बनायचे होते. अनेकदा मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे. अशावेळी शेजारी राहणारे आणि मित्र यांच्याकडे हात पसरावे लागत होते, असे घनश्यान नायक यांनी सांगितले.

दरम्यान, एकेकाळी पैशांसाठी दुसऱ्याकडे हात पसराव्या लागणाऱ्या 76 वर्षीय घनश्याम नायक यांना ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने प्रसिद्धी आणि पैसाही दिला. आज त्यांच्याकडे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये दोन फ्लॅट आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या