‘तारक मेहता का…’ मालिकेमध्ये ट्विस्ट, गेल्या 12 वर्षात जे नाही घडले ते आता घडणार

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या 12 वर्षापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर, त्यांच्या जिवंत भूमिकेवर चाहते प्रेम करतात. मात्र चाहत्यांना एक खंत मात्र कायमच जाणवत होती, ती देखील आता पूर्ण होणार आहे.

टीव्हीवरील या प्रसिद्ध मालिकेतील पात्र पत्रकार पोपटलाल यांचे लग्न कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता निर्माते प्रेक्षकांची ही मागणीही पूर्ण करण्याच्या तयारीत असून लवकरच पोपटलालच्या घरी शहनाई वाजणार आहे. विशेष म्हणजे मुलीने देखील पोपटलालशी लग्न करण्यास होकार दिला आहे.

‘तारक मेहता का…’ मधील जेठालालला एका एपिसोडचे मिळतात ‘एवढे’ पैसे, वाचून हैराण व्हाल

दरवेळेच पोपटलाल एका नवीन मुलीच्या प्रेमात पडतो किंवा एक नवीन स्थळ त्याच्यासाठी येते. मात्र काही ना काहीतरी विघ्न यात येते आणि पोपटलाल याचे लग्न मोडले. त्यामुळे पोपटलालकडे ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ असे गाणे म्हणण्यावाचून पर्याय राहत नाही. मात्र आता त्याच्या स्वप्नातील राणी त्याला मिळाली असून ज्या मुलीसोबत लग्नाची बोलणी चालू आहेत तिने होकार दिला आहे. त्यामुळे यंदा पोपटलालचे दोनाचे चार हात होणार हे नक्की.

पोपटलालची ‘पूजा’ होणार?

popatlal

नुकत्याच एका एपिसोडमध्ये पोपटलाल याची भेट पूजा नावाच्या एका तरुणीशी भेट झाल्याची माहिती देण्यात आली. ही तरुणी खास पोपटलाल याला भेटण्यासाठी मुंबईला आली आहे. पूजाला पाहून पोपटलाल पुन्हा एकदा लग्नाची स्वप्ने रंगवायला लागला आहे. पूजाने देखील होकार दिला असून यामुळे पोपटलालच नाही तर संपूर्ण गोकुलधाम सोसायटी उत्साही आहे आणि पूजाच्या स्वागताची तयारी करत आहे.

कोण आहे पोपटलाल?

popat

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये पत्रकार पोपटलालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव श्याम पाठक आहे. खऱ्या आयुष्यामध्ये 44 वर्षीय श्याम यांचे रेशमी (Reshmi) यांच्याशी विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आणि दोन मुलं आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या