तबलिगी जमातमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, गृहमंत्रालयाची राज्यसभेत माहिती

दिल्लीत निजामुद्दीनच्या कार्यक्रमात अनेक तबलिगी जमातचे लोक एकत्र आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला अशी माहिती गृहमंत्रालयाने राज्यभेत दिली आहे.

क्वारंटाईन सेंटरमध्ये तबलिगी जमातच्या 3 महिलांना दिवस गेले, प्रशासनाने हात टेकले

लोक मोठ्या प्रमाणात एकत्र जमले आणि अनेक लोकांना कोरोनाचई लागण झाली अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या 233 सदस्यांना अटक केली असून 29 मार्चपासून संघठनेच्या कार्यालयातून 2 हजार 361 जणांना बाहेर काढण्याचे आल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.

क्वारंटाईन संपल्यावर दोन बायकांच्या घरी तबलिगीची पळापळ! तिसऱ्यांदा पुन्हा क्वारंटाईन 

एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी म्हणाले की जमात प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संकटकाळात वेगवेगळे आदेश लागू असताना निजामुद्दी सारख्या छोट्या भागात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. या कार्यक्रमात कोरोनाचे कुठलेच नियम पाळले गेले नाही. या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढला असे रेड्डी यांनी राज्यसभेत म्हटले आहे.

तबलिगींनी कोरोना पसरवला, मुख्तार अब्बास नक्वींनी फटकारले

आपली प्रतिक्रिया द्या