शिक्षिकेने चार वर्षाच्या मुलीच्या ओठावर दिले चटके, गुन्हा दाखल

मध्य प्रदेशमध्ये एका शिक्षिकेने चार वर्षाच्या मुलीच्या ओठांवर चटके दिले आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार छछरिया शहरात किंडरगार्डनमध्ये एक निशा ( नाव बदलेले) ही चार वर्षाची मुलगी आणि तिचा लहान भाऊ जात किंडर गार्डन ट्युशनमध्ये असत. सोमवारी निशाने गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षिकेने तिला मारले. इतकेच नाही तर माचीसची काडी पेटवून निशाच्या वरच्या ओठाला चटके दिले.

निशा घरी आल्यानंतर खूप आजारी पडली. तिच्या ओठावर चटके दिल्याचे डागही होते. तेव्हा निशाच्या आई वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आणि शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शिक्षिकेने सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तसेच या मुलांना आपण ट्युशनमध्ये यायला सांगितले नाही तरी त्यांचे आई वडिल त्यांना पाठवतात असे शिक्षिकेने म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या