ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘मीरा’ वाघिणीचा मृत्यू

698

चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील मीरा या दोन वर्षे वयाच्या वाघिणीचा मृत्यू झाला. प्रकल्पातील तलाव परिसरात सोमवारी सकाळी तिचा मृतदेह आढळला. दोन दिवसांपूर्वी रानगव्याची शिकार करताना मीरा जखमी झाली होती. मात्र तिच्यावर उपचार करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला.

ताडोबामधील प्रसिद्ध अशा माया या वाघिणीची माया ही बछडी होती. दोन दिवसांपूर्वी माया आणि तिचे दोन बछडे रानगव्याची शिकार करत होते. या शिकारीतील झटापटीवेळी रानगव्याची शिंग मीराच्या छातीत आणि पोटात खुपसली गेली. प्रकल्पाच्या प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच तिच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी तिची रेकी सुरू केली. मात्र, उपचार होण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध अशा मटकासूर नावाचा वाघ आणि माया वाघीण यांची मीरा ही बछडी होती. मायाला सूर्या नावाचा बछडाही आहे. माया आणि मटकासूर ही वाघांची जोडी अतिशय लोकप्रिय आहे. त्यामुळे जन्मल्यानतंर मीरा आणि सूर्या ही बछड्यांची जोडीही प्रसिद्धीला आली होती. माया तिच्या बछड्यांना शिकारीचं तंत्र शिकवण्याच्या प्रयत्नात होती. मात्र कदाचित ते तंत्र नीटसं अवगत न झाल्यामुळे मीराला अपघात झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्युने व्याघ्रप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या