चुकीच्या इतिहासाचे जनक बिप्लब देव कुमार यांचा नवा शोध

80

सामना ऑनलाईन, अगरतळा

महाभारताच्या काळातही इंटरनेट होते असा छातीठोक दावा करणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री बिल्पब देव कुमार यांनी इतिहासासंदर्भात एक नवा शोध लावलाय. त्यांनी दावा केला आहे की रविंद्रनाथ टागोरांनी त्या काळात जुलुमी इंग्रज राजवटीचा विरोध करण्यासाठी नोबेल पुरस्कार परत केला होता. टागोरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा दावा केला.

टागोर यांनी नोबेल पुरस्काराप्रमाणे त्यांना प्रदान करण्यात आलेला नाईटहूड पुरस्कार देखील परत केल्याचं बिप्लब म्हणाले. जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी टागोरांनी हा पुरस्कार परत केला होता. बिप्लब यांनी नाईटहूड  पुरस्कार परत केल्याची गोष्ट खरी असली तर टागोरांनी नोबेल पुरस्क कधीही परत केला नव्हता असं इतिहास तज्ञांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या