टकाटक ‘अडल्ट’ पण सामाजिक संदेश देणारा चित्रपट, कॉलेजमध्ये जोरदार प्रमोशन

takatak

सामना ऑनलाईन । मुंबई

हटके डायलॉग, बोल्ड दृश्य यामुळे सध्या टकाटक या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा केवळ अडल्ट चित्रपट असल्याचा गैरसमज करून घेऊ नका, तर तो सामाजिक संदेश देणारा चित्रपट असल्याचे अभिनेता प्रथमेश परब याने सांगितले. येत्या 28 जून रोजी प्रथमेश परब याचा टकाटक हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाचे विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात प्रमोशन करण्यात आले.

या वेळी बोलताना प्रथमेश म्हणाला की, हा चित्रपट युवा वर्गाच्या मानसिकतेवर आधारित आहे. त्यामुळेच चित्रपटाचे प्रमोशन वेगवेगळ्या महाविद्यालयातून केले जात आहे. मराठीतील पहिला प्रौढांसाठीचा चित्रपट असला तरी एक नाजूक विषय या चित्रपटाद्वारे हाताळायचा प्रयत्न दिग्दर्शक मिलिंद कावडे यांनी केला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशन त्यावेळी प्रथमेश परबसह त्याचे चित्रपटातील सहकलाकार रितिका श्रोत्री व प्रणाली भालेराव उपस्थित होते.

‘टकाटक’ येतोय!