आई-वडिलांना सांभाळा अन्यथा 30 टक्के पगार कपात!

संभाजीनगर जिल्हा परिषद सेवेत असलेले जे अधिकारी-कर्मचारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करीत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक देत नसतील अशांच्या वेतनातून 30 टक्के रक्कम कपात करून आई-वडिलांच्या खात्यात वळती करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्षा मीना रामराव शेळके यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात घेण्यात आली. आरोप प्रत्यारोप, मागण्या सुरू असतानाच अध्यक्षा मीना शेळके यांनी जे अधिकारी, कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही त्यांच्या वेतनातून 30 टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. सभागृहांनी या निर्णयाचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. संभाजीनगर जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या