… म्हणून तलवार दाम्पत्य सोमवारपर्यंत तुरुंगातच राहणार

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्‍ली

आरुषी हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. राजेश व नुपूर तलवार यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर आज त्यांची गाझियाबाद येथील डासना तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र अद्याप तुरुंग अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत न मिळाल्याने त्यांना सोमवारपर्यंत तुरुंगातच रहावे लागणार आहे.

एखाद्या कैद्याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाची प्रत तुरुंग अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतरच त्या कैद्याची सुटका केली जाते. तलवार दाम्पत्यांच्या निर्णयाची प्रत अद्याप तुरुंग अधिकाऱ्यांना मिळालेली नाही तसेच त्यानंतर शनिवार, रविवार असल्याने त्यांची सुटका सोमवारी होणार आहे.

केवळ संशयाच्या आधारावर डॉ. राजेश व नुपूर तलवार यांना दोषी ठरवता येणार नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने तलवार दाम्पत्याची निर्दोष सुटका केली. मात्र त्यामुळे आरुषीला मारले कुणी, या प्रश्नाचे गूढ कायम राहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या