तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचे आंदोलन २५ मे पर्यंत स्थगित

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तमिळनाडूच्या शेतकऱ्यांनी आंदोलन २५ मेपर्यंत स्थगित केलं आहे. मात्र २५ मेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा आंदोलनं करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

३९ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर तमिळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी २२ तारखेला मानवी मुत्र प्राशन करून सरकारचा विरोध केला होता. तसंच मागण्या पूर्ण केल्या नाही तर मानवी शनिवारी मानवी विष्ठा खाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी २५ मेपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे.


तमिळ शेतकऱ्यांनी अनेक वेळा अनोख्या पद्धतीनं विरोध करत सरकारचं लक्ष वेधण्याच प्रयत्न केला होता. गळ्यात मानवी कवट्या घालून आणि रायसीन हिल्सवर नग्न होत प्रदर्शन केलं होतं. तसंच तोंडात साप आणि उंदीर पकडून सरकारचा निषेध केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या