क्वारंटाईनमधील व्यक्ती नग्नावस्थेत पळाला, वृद्ध महिलेचा घेतला चावा

3015
फोटो- प्रातिनिधीक

श्रीलंकेहून परतल्यानंतर घरातच क्वारंटाईमध्ये राहण्यास सांगितलेला एक तरुण शनिवारी नग्नावस्थेत त्याच्या घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने एका 85 वर्षीय महिलेचा चावा घेतला असून यात त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.

तामिळनाडूतील जक्कमानायाकानपट्टी येथे राहणारा या तरुणाचा कपड्यांचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त तो काही दिवसांपूर्वी श्रीलंकेला गेला होता. हिंदुस्थानात परतल्यानंतर त्याचे स्कॅनिंग झाल्यानंतर त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार तो त्याच्या घरातच राहत होा. मात्र शुक्रवारी अचानक तो नग्नावस्थेत घराबाहेर पडला. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या एका आजीच्या मानेवर त्याने जोरात चावले. आजींच्या मानेतून रक्त येईपर्यंत त्याने आजीला सोडले नाही. आजुबाजुच्या लोकांनी त्याला पकडून एका खोलीत बंद केले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान जखमी महिलेला बोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या