चित्रपट पाहण्यासाठी पैसे दिले नाही, मुलाने वडिलांना पेटवले

25

सामना ऑनलाईन । वेल्लोर

चित्रपटाच्या तिकीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांनी पेटवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या वेल्लोर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. अजिथ कुमार असे मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिथ कुमार याचे वडील पांडियन (45) हे रोजंदारीच्या कामावर जातात. काही कारणास्तव पत्नीसोबत भांडण झाल्याने त्यांनी घर सोडून रस्त्याच्या कडेला राहायला सुरुवात केली होती. गुरुवारी सकाळी एका बंद दुकानासमोर पांडियन झोपले असताना अजिथ कुमार तेथे आला वडिलांकडे ‘विश्वासम’ हा चित्रपट पाहण्यासाठी पैसे मागू लागला. परंतु पांडियन यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात अजिथ कुमारने घरातून रॉकेलची बाटली आणत वडिलांच्या अंगावर रिकामी केली आणि आग लावून पळाला.

आगीच्या चटक्यामुळे पांडियन मोठ्याने ओरडू लागले तेव्हा जवळच्या मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेत आग विझवली आणि त्यांना वेल्लोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून पोलिसांनी अजिथ कुमारला ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या