स्मार्टफोनसाठी 8 दिवसाच्या चिमुरडीला विकले..

1018

सोन्याची चैन आणि स्मार्ट फोनच्या हव्यासापोटी 8 दिवसाच्या एका चिमुरडीला विकल्याची धक्कादायक घटना तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्हात घडली आहे. मुलगी नको या घृणास्पद, बुरसटलेल्या मानसिकतेमध्ये अडकलेल्या ह्या गुन्हेगाराचे नाव येसुरुध्दराज असून तो रोजंदारीवर काम करायचा.

तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील अरुगमपट्टी गावातील येसुरुध्दराज काही पैशांसाठी चक्क स्वत:च्या मुलीला विकले आहे. गुन्हेगार येसुरुध्दराज याची पत्नी पुष्पलता हिने 8 नोव्हेंबरला स्थानिक रुग्णालयात एक मुलगी आणि एक मुलगा अशा जुळ्या बाळांना जन्म दिला होता. येसुरुध्दराजला फक्त मुलगा हवा होता म्हणून त्याने कोणालाही कळू न देता तीन स्थानीय लोकांच्या मदतीने त्याचा नवजात मुलीला विकण्याचे धाडस केले. कारस्थानी पतीने आपल्या बाळांच्या जन्माबाबत असा काही कट रचला असेल,याची कल्पना पुष्पलताला नव्हती. मुलीला विकण्याचा संपूर्ण सौदा हा 1,80,000 रुपयांमध्ये झाला. त्यांमधील 80 हजार रुपये हे तीन दलालांना वाटले व उरलेली रक्कम ही त्याने घेतली. हे सर्व झाल्यानंतर आरोपीने त्याचा नवजात मुलासाठी सोन्याची चैन घेतली. व स्वत:साठी एक स्मार्ट फोन, मोटारसायकल आणि सायकल देखील घेतली.

मुलगी हरवून काही तास झाल्यानंतरही मुलीचा तपास न लागला नाही तरीही आपला पती आनंदी आहे. ही गोष्ट येसुरुध्दराजच्या पत्नीला संशयास्पद वाटली. त्यामुळे ती रुग्णालयातच तिच्या नवऱ्याशी भांडायला लागली. 8 दिवसाची मुलगी हरवल्याची घटना जेव्हा रुग्णालय प्रशासनाला समजली तेव्हा त्यांनी ‘चाइल्ड लाइन’ ला फोन केल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले. व गुन्हेगाराला अटक केली. 8 दिवसाच्या नवजात मुलीला विकल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन बाल पोषण संस्थेला पाठविले.

आपली प्रतिक्रिया द्या