‘तानाजी’ चित्रपटात ‘हा’ मराठी अभिनेता साकारतोय शिवाजी महाराजांची भूमिका

2379

अजय देवगण याने नुकताच त्यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या तानाजी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. या चित्रपटातील तानाजींचा लूक शेअर केल्यानंतर त्याने छत्रपती शिवाजी महारांजांचा व उदयभान सिंग राठोड या दोन महत्त्वाच्या भूमिकांचे लूक रिलीज केले आहेत.

‘तानाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर दिसणार आहे. त्याचा हा लूक पाहून चाहते खूष झाले असून शरद डिट्टो शिवाजी महाराजांसारखा दिसत असून तो ही भूमिका उत्तम निभावून नेईल अशी प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिली आहे. अजय देवगणने त्यांच्या इंस्टाग्रामवरून शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा लूक शेअर केला असून सोबत ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’, अशी कॅप्शन शेअर केली आहे.

अजय देवगणने शरद केळकर सोबतच सैफ अली खानचा देखील रिलीज केला आहे. या चित्रपटात सैफ उदयभान सिंग राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय व सैफ हे तब्बल 13 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या