बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना,कमाई100 कोटींच्या पार

1167

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा अजय देवगणचा ‘तान्हाजी ः द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा तुफान गाजतोय. त्यासोबतच देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाने अवघ्या सहा दिवसांत 107 कोटींचा गल्ला जमकला आहे. 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळकणारा ‘तान्हाजी’ या वर्षातील पहिला सिनेमा ठरला आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ हा सिनेमा देशभरात 4540 स्क्रीनवर रिलीज झाला आहे. ‘तान्हाजी’ने पहिल्या दिवशी 15.10 कोटी, शनिकारी 20.57 कोटी, रकिकारी 26.26 कोटी, सोमकारी 13.75, मंगळकारी 15.28 कोटी रुपये आणि बुधकारी 16.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 150 कोटींचा आकडा लवकरच पार करेल असा विश्वास सिनेतज्ञांनी व्यक्त केला आहे.

गंभीर विषय, कमी स्क्रीन तरीही…दीपिकाचा ‘छपाक’ यशस्वी
‘तान्हाजी’सोबत दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ‘छपाक’ने सहा दिवसांत 26.31 कोटींचा व्यवसाय केला आहे. ऑसिडहल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर हा सिनेमा आहे. गंभीर सामाजिक विषय असलेला सिनेमा जेवढी कमाई करेल तेवढी कमाई ‘छपाक’ करीत आहे. ‘छपाक’ सिनेमा तयार करण्यासाठी 35 कोटींचा खर्च आला. ‘तान्हाजी’ला देशभरात 4540 स्क्रीन्स मिळाले आहेत, तर ‘छपाक’ 1700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या