तानाजी चित्रपट करतोय 100 कोटींच्या दिशेने घौडदौड

2576

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचील घौडदौड सुरूच असून बुधवारी हा चित्रपट 10 0कोटींचा आकडा पार करू शकतो. या चित्रपटाने मंगळवार पर्यंत 90 कोटी कमावले आहेत.

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या तानाजी चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी 16 कोटींची कमाई केली होती. सुरुवातीला हा चित्रपट महाराष्ट्रात जास्त गाजेल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र या चित्रपटाने संपूर्ण देशात व जगात धूम माजवली आहे. शुक्रवार शनिवार रविवार विकेंडचे दिवस हाऊसफुल्ल गेल्यानंतर तरी चित्रपटाचे तिकीट सहज उरलब्ध होईल अशी चाहत्यांना आशा होती. मात्र सोमवार मंगळवारी देखील हा चित्रपच हाऊसफुल्ल ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम पाहताना डोळे क्षणभऱही स्क्रिनवरून हटत नाहीत, अशी प्रतिक्रीया प्रेक्षकांमधून येत आहे्.

तानाजी या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशी 16 कोटी, दुसऱ्या दिवशी तब्बल 20 कोटी, शनिवारी 25.50 कोटी, सोमवारी – 13.50 कोटी, मंगळवारी 15.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 90 कोटींचा आकडा पार केला असून बुधवारी हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या