
एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर आधारित तांडव ही वेबसिरीज रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसिरीजमधून हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात असून त्यामुळे आता तांडववरून तांडव सुरु झाले आहे. मात्र याच दरम्यान आता सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करत माफी मागितली आहे.
अली अब्बास जफर हे ट्विट करत म्हणाले आहेत की, तांडव वेब सीरिजच्या संपूर्ण टीमचा आणि क्रू मेंबर्सचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जर कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो, असे म्हटले आहे.
Our sincere apologies . pic.twitter.com/Efr9s0kYnl
— ali abbas zafar (@aliabbaszafar) January 18, 2021
काय आहे प्रकरण?
तांडव वेबसिरीजमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. तांडव ही वेबसिरीज अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे. काही लोकांनी या वेबसिरीजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अभिनेता मोहम्मद जीशान अयूब हा भगवान शंकराच्या वेषात दिसत आहे. त्या सिनमध्ये भगवान श्री राम व शिव शंकरावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या गोष्टीवरुन चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषत: हिंदू संघटनां या वेबसिरीजवर भडकल्या असून तांडवच्या मेकर्सनी माफी मागावी असे सांगितले होते.