तान्हाजी चित्रपटाने गाठला 145 कोटींचा आकडा, आता लक्ष्य 200 कोटींचे

851

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा अजय देवगणचा ‘तान्हाजी ः द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. हा चित्रपट देशभरात तुफान गाजत आहे. या चित्रपटाने गेल्या 9 दिवसात तब्बल 145 कोटींची कमाई केली आहे. नऊ दिवसानंतरही या चित्रपटासाठी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागत असून लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल असे बोलले जातेय.

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी तान्हाजीच्या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार तान्हाजी या चित्रपटाने नवव्या दिवशी 15.10 कोटींची कमाई केली. ही कमाई या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा देखील जास्त आहे. तसेच त्यांनी येत्या शुक्रवारपर्यंत हा चित्रपट 175 कोटीपर्यंतचा आकडा गाठू शकतो. मात्र या चित्रपटाची घौडदौड पाहता पुढिल आठवड्याच्या अखेरपर्यंत हा चित्रपट 200 कोटींचा आकडा गाठू शकतो असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या