तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहा मराठीतून

तान्हाजी मलुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरकीराने जिकाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. त्यांच्या शौर्याची गाथा अजय देवगण याच्या ‘तान्हाजी द अनसंग कॉरिअर’ या हिंदी सिनेमातून दाखकण्यात आली होती. आता हा चित्रपट मराठीत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 23 एप्रिलला दुपारी 12 वाजता हा सिनेमा मातृभाषेत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या भव्यदिव्य सिनेमाविषयी सांगताना स्टार प्रवाह कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्कणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या