राज्यात ‘तान्हाजी’ करमुक्त

797

महाराष्ट्राची अन् मराठी योद्धय़ाची वीरता जगासमोर मांडणाऱया ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकीट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वतः राज्य शासनाच्या तिजोरीत भरण्याचा निर्णय झाला. यासंदर्भातील शासन निर्णय जारी झालेल्या तारखेपासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकीट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या