‘तान्हाजी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात

940

राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासह भागीदारी केलीआहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले, विस्मरणातील शूरवीरांची गौरवगाथा आणि पर्यटनाला चालना दिली जाणार आहे.

चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचीमाहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकारघेतला आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाने आपल्या समृद्ध वारशाचा गौरवसाजरा करण्यासाठी जनतेला राज्यातील दुर्लक्षित सौंदर्याकडे आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी पर्यटन संचालनालयाने चित्रपटाचे मुख्य अभिनेते अजय देवगण यांचे सहकार्य घेतले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले की, आमची वारसास्थळे आजही प्रेरणादायी आहेत. ही स्थळे आपल्या विशाल इतिहासाच्या घटना जतन करतात. आपल्यातील प्रत्येकाने आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कृत्याबद्दल जागरूक असणे आणि त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे.

आपल्या ऐतिहासिकदृष्टय़ा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही सिंहगड, रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड इत्यादी अनेक किल्ले आहेत जे आपल्याला आपल्या गौरवशाली भूतकाळाची झलक पाहण्यास मदत करतात. लोकांनी या किल्ल्यांना भेट देण्यासाठी आणि राज्यात असलेल्या अशा ऐतिहासिक स्थळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही चित्रपटासह को-ब्रँडेड मोहीम तयार केली आहे. फोटो आणि व्हिडिओ स्पर्धा या अनोख्या उपक्रमाचा विस्तार म्हणून पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ स्पर्धा देखील सुरूकेली आहे. हौशी तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धाखुली आहे. यासंबंधी अधिक माहिती महाराष्ट्र टुरिझमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरउपलब्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या