नानांना दिलासा, तनुश्रीने केलेल्या आरोपाचे पुरावे नाहीत; पोलिसांचा अहवाल

75

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या कथित विनयभंगाच्या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांचे पुरावे नसल्याचा अहवाल ओशिवारा पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केला आहे. त्यामुळे आता न्यायालय यावर काय सुनावणी करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी जवळीक साधत चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप करत तनुश्रीने खळबळ उडवून दिली होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘#मीटू’ या मोहिमेबद्दल बोलताना तिने हा आरोप केला होता. त्यावेळी नानांविरुद्ध आपण आवाज उठवल्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबीयांना गुंडांकरवी धमकावल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले होते.

तनुश्रीने केलेले आरोप नाना पाटेकर यांनी फेटाळून लावले होते. यानंतर तनुश्रीने पोलिसात तक्रार दिली आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. आता पोलिसांनी तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांचे पुरावे नसल्याचा अहवाल दिल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या