बॉलिवूडची ‘ही’ हॉट अभिनेत्री जाणार बिग बॉसच्या घरात?

सामना ऑनलाईन । मुंबई

मंगळवारी अभिनेता सलमान खानने औपचारिकरित्या बिग बॉसच्या १२ व्या सिझनची घोषणा केली. मंगळवारी त्याने पत्रकार परिषदेत हा सिझन जोड्यांमध्ये रंगणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या सिझनमध्ये कोण कोण दिसणार यावरून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमध्ये हॉट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली तनुश्री दत्ता देखील या बिग बॉसच्या घऱात जाणार असल्याचे बोलले जात आहे.

tanushree-dutta-1

आशिक बनाया आपने’, ढोल, रकीब, चॉकलेट, रामा द सेवियर अशा चित्रपटांत झळकलेली तनुश्री ही तिची बहिण इशिता दत्तासोबत या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा बिटाऊनमध्ये रंगली आहे. इशिता ही देखील अभिनेत्री असून काही दिवसांपूर्वी ती कपिल शर्माच्या फिरंगी चित्रपटात दिसली होती. याबाबत प्रसारमाध्यमांनी तनुश्रीला विचारले असता तिने याबाबत अद्याप विचार केला नसल्याचे सांगितले आहे. ‘मला गेली अनेक वर्षे बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप मी विचार केलेला नाही’ असे तनुश्रीने सांगितले.

summary : tanushree dutta to participate in big boss season 12