हिंदुस्थानी टपाल विभागाच्या वतीने नुकताच भारतीय टपाल विभागाच्या मुंबई उत्तर-पश्चिम विभागातर्फे कांदिवली येथील समता विद्यामंदिर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला समता विद्यामंदिरातील विद्यार्थी आणि परिसरातील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टपाल विभागाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कांदिवलीत महामेळाव्याचे आयोजन केले होते. यात टपाल विभागाच्या बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, आवर्ती जमा योजना (रिकरिंग डिपॉझिट खाते), महिला सन्मान योजना, मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते, मुदत ठेव जमा खाते, अटल पेन्शन योजना, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली. रहिवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुंबई उत्तर-पश्चिम विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रूपेश सोनावले यांनी उपस्थितांचे आभार मानले.