तापसीचा रुद्रावतार, जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचे थोबाड फोडले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या दमदार अभिनयासह सौंदर्याचीही चर्चा सर्वत्र असते. नेहमी कूल दिसणारी तापसी कधी-कधी मात्र दबंग रूप धारण करते. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, तापसीने जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याचे थोबाड रंगवले होते.

‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसी आणि तिची बहिण जेवणासाठी एकत्र गेली होती. फुटपाथवर ड्रायव्हरची गाडी घेऊन येण्यासाठी वाट पाहात असताना एक व्यक्ती बाईकवरून तिकडून जात असतो आणि माझ्यासमोर बाईक उभी करून परवानगी न घेता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो, असे तापसी सांगते. जबरदस्तीने सेल्फी घेणाऱ्याला पाहून तापसीचा पारा चढतो आणि ती त्या चाहत्याच्या थोबाडीत मारते. तसेच त्याचा फोनही हिसकावून घेते आणि सेल्फी डिलिट करते.