दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यपदाची निवड करण्यात आली आहे. यंदाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. यााआधी अरुणा ढेरे या अध्यक्षा होत्या.
लोक संस्कृतीच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या सहाव्या महिला अध्यक्ष आहे. संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली. या बैठकीत अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.