अभिनेत्रीने शेअर केला लहानपणीचा फोटो, नेटिझन्स म्हणाले, हा तर तैमूर!

1881

बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ फेम अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही आपल्या स्टायलिश आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु नुकताच तिने एक असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूरची चर्चा सुरू झाली. अभिनेत्रीने आपला लहानपणीचा फोटो शेअऱ केला, मात्र अनेकांनी हा तर तैमूर आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तारा सुतारिया (Tara Sutaria) हिने इन्स्टाग्रामवर आपल्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती तैमूर अली खानसारखी दिसत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. या फोटोखाली नेटिझन्सने अनेक मजेशिर कमेंट केल्या आहेत. ताराची तुलना तैमूरशी केली जात आहे. एका युझरने तैमूरलाही मागे सोडले अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या छोटा तैमूर असे म्हटले आहे.

tara

दरम्यान, ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’मध्ये दिसलेली तारा तेलुगू सुपरहिट चित्रपट ‘आरएक्स 100’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत दिसणार आहे. अहानचा हा पदार्पणाचा चित्रपट आहे. यासह ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमूख स्टारर फिल्म ‘मरजावां’मध्येही दिसणार आहे. 8 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.


View this post on Instagram

Cub/Pup

A post shared by TARA (@tarasutaria) on

आपली प्रतिक्रिया द्या