तारक मेहता का उल्टा चष्मामधून देणार स्वच्छ हिंदुस्थानचा संदेश

सामना ऑनलाईन । मुंबई

तारक मेहता का उल्टा चष्मा ही छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका. या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेऊनच या मालिकेच्या टिमची केंद्र सरकारने स्वच्छता अभियानाचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे या मालिकेतून कायम स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केले जाते. आता लवकरच या मालिकेतून कचर रिसायकल कसा करता येईल हे दाखविण्यात येणार आहे.

घरातील व सोसायटीतील कचरा एकत्र करुन फेकून देण्याऐवजी पुन्हा त्याचा वापर करता येऊ शकतो. त्याचा अनेक प्रकारे वापर करता येहऊ शकतो हे या मालिकेतील काही भागांमध्ये दाखविले जाणार आहे. तसेच घरातील कचरा ओला आणि सुका अशा दोन भागात विभागला पाहीजे हे देखील आम्ही या भागांमधून दाखविणार अहोत असे मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितले.