TMKOC – जेठालालची भूमिका नाकारल्याबद्दल राजपाल यादवला खंत वाटते?

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या आवडीचा “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो गेली 12 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. अभिनेते दिलीप जोशी साकारत असलेली जेठालाल ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली असून, ते साकारत असलेल्या जेठालाल या पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. पण हा शो सुरू होण्यापुर्वी जेठालाल ह्या भूमिकेसाठी लोकप्रिय विनोदी कलाकार राजपाल यादव याला विचारणा करण्यात आली होती. मात्र राजपाल याने या भूमिकेसाठी नकार दिला होता. हे पात्र नाकारल्याबद्दल त्यांना खंत वाटते का असा प्रश्न एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता.

नुकत्याच झालेल्या एका रेडीओ मुलाखतकाराने राजपाल यादव यांना जेठालालची भूमिका नाकारल्याची खंत वाटते का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राजपाल यादवने म्हटलंय की ‘जेठालालचं पात्र एका उत्तम कलाकाराने साकारलं आहे.  कोणतंही पात्र हे त्या कलाकाराने उभं केलेलं पात्र असतं.’  अभिनय क्षेत्रात एका कलाकाराने साकारलेल्या पात्रामध्ये आपण केलेलं पात्र बसवण्याचा प्रयत्न मी करू इच्छित नाही असं राजपालने म्हटलंय. पात्र तेच असावं जे राजपालसाठी बनलेलं असावं, त्याच्या नशिबात असावं.  कोणत्याही कलाकाराला इतरांनी रंगवलेलं पात्र साकारण्याची संधी दिली जाऊ नये असं वाटत असल्याचंही त्याने म्हटलंय.  ही भूमिका आपल्या वाटेला न आल्याची यामुळेच खंत वाटत नसल्याचं राजपालचं म्हणणं आहे. लवकरच राजपाल ‘हंगामा-2’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या