तारक मेहतामधील बबिताला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

तारक मेहता का ऊल्टा चश्मा या मालिकेतील बबिता म्हणजेच मूनमून दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मूनमून दत्ता यांच्यावर चार राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईवर स्थगिती दिली आहे. मूनमून दत्ता यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी हलवण्याबाबत न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

मूनमून दत्ता यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह करताना जातीयवादी वक्तव्य केले होते. त्यावरून सोशल मीडियावर मूनमून दत्ताला अटक करण्यासाठी ट्रेंड चालवण्यात आले होते. नंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर माफीही मागितली होती.

मूनमून दत्ता यांच्यां विरोधात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आले होते. कोर्टाने या कारवाईवर स्थगिती दिली आहे. असे असले तरी हरयाणामध्ये दाखल झालेल्या तक्रारीवर कार्यवाही सुरू राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या