पोस्टाच्या तिकिटावर वडापाव, मोदक

  • दरवर्षी नवनवी पोस्टाची तिकिटे प्रसिद्ध करणाऱ्या टपाल खात्याने यंदा हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीशी संबंधित २४ तिकिटे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • पोस्टाच्या तिकिटांवर मुंबईचा वडापाव आणि महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मानाचे स्थान पटकावणाऱ्या मोदकाची छबी दिसणार आहे.
  • वडापाव म्हणजे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचे लाडके फास्टफूड
  • उकडीचे मोदक हा गणेशोत्सव किंवा संकष्टी-अंगारकीला महाराष्ट्रातील घराघरात केला जाणार गोड पदार्थ आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या मनात या पदार्थाला वेगळेच स्थान आहे. उकडलेल्या तांदळाच्या पिठीत खोबऱ्याचे गोड सारण भरुन केले जाणारे मोदक पाहून चटकन तोंडाला पाणी सुटते.
  • पोस्टाच्या तिकिटांवर तिरुपतीचे लाडू आणि मोतिचूर लाडू तसेच इडली-डोसा, हैदराबादी बिर्याणी, पोंगल, बेबी अप्पम, मालपुआ, ठेकुआ, बघारे बैंगन (भरलं वांग), सेंवइयाँ (शेवयांचा गोड शिरा), गुझिया (करंजी/कानुले), ढोकळा, दालबाटी, लिट्टी चोखा, मक्के की रोटी आणि सरसों का साग (मक्याची भाकरी-मोहरीची भाजी), छोले भटुरे, गोलगप्पा (पाणीपुरी), पेढा हे पदार्थ दिसणार असल्याचे समजते.
आपली प्रतिक्रिया द्या