
टाटा समूहाने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. एका आर्थिक वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळविणारा टाटा हा देशातील पहिला ग्रुप ठरला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा मोटर्स ही 1 लाख कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठणारी देशातील आठवी दुसरी कंपनी ठरली आहे. सीएनबीसीनुसार सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल, एलआयसी, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या पंपन्यांमध्ये 1 लाख कोटींहून अधिक तिमाही महसूल आहे. सध्या टाटा समूहाच्या सर्व लहान-मोठय़ा पंपन्यांचा एक युनिट ग्राह्य धरला तरी 125 अब्ज डॉलरचा महसूल मिळत आहे. यामुळे तो जगातील 64 वा सर्वात मोठा ग्रुप बनला आहे.