टाटा मोटर्सकडून वाहनांच्या किंमत वाढीची घोषणा, ‘हे’ आहे कारण

टाटा मोटर्स ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी 1 एप्रिल 2023पासून त्‍यांच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या किमतीत जवळपास 5 टक्‍क्‍यांची वाढ करणार आहे. किमती वाढवण्याचा निर्णय हा बीएस-6 फेज 2 उत्सर्जन नियमांचे अधिक कठोर पालन करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

या मानकांची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओमध्ये बदल केल्यामुळे ग्राहक व फ्लीट मालक शुद्ध, हरित व तंत्रज्ञानदृष्‍ट्या उत्कृष्ट ऑफरची अपेक्षा करू शकतात. ज्‍यामधून उच्‍च फायदे व कमी मालकी हक्‍क खर्चाची खात्री मिळते. किमतीतील वाढ व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीवर लागू केली जाईल. वैयक्तिक मॉडेल आणि प्रकारानुसार रक्कम बदलू शकते.