टाटा कंपनी आता लवकरच स्मार्टपह्न मार्पेटमध्ये उतरणार आहे. कंपनीने याआधी मोबाईल नेटवर्क आणि हँडसेट सेक्टरमध्ये उडी मारली आहे. परंतु, आता टाटा कंपनी स्मार्टफोन बनवणार आहे. यासाठी टाटा समूह चीनची मोठी कंपनी विवो खरेदी करणार आहे. विवोच्या कंपनीत टाटा पंपनीची 51 टक्के भागीदारी असेल. स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उतरण्यासाठी टाटा समूहाने विवो सोबत प्राथमिक बोलणी सुरू केली आहे. टाटा आणि विवो या दोन पंपन्यांत करार झाल्यानंतर टाटा कंपनी स्मार्टपह्न बनवणार आहे. टाटा समूह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. याआधी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आयपह्न बनवणारी पहिली हिंदुस्थानी कंपनी ठरली आहे. याशिवाय, टाटा इलेक्ट्रॉनिक्स तामिळनाडूच्या होसूर मध्ये आयपह्न असेंबलिंग प्लांट बनवत आहे. विवोने 2022-23 या आर्थिक वर्षात 211 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.