राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर आंदोलकांची दगडफेक

30

सामना ऑनलाईन । सोलापूर

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिधोर गावाजवळ राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या आहेत. मात्र घटनेत सदाभाऊ खोत यांना कोणतीही दुखापत झालेली नसून ते सुखरूप आहेत. शेतकर्‍यांच अनेक प्रश्न प्रलंबित असताना, त्याच्या समस्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

सदाभाऊ खोत पंढरपूर दौऱ्यावर जात असताना माढा तालुक्यात त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आहे. गाजर दाखवून त्यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या. एकूण तीन ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या