टॅटूची नक्षी कानावर

सामना ऑनलाईन, मुंबई

आपल्या शरीरावर वेगवेगळय़ा ठिकाणी तुम्ही टॅटू काढलेले पाहिलेच असतील… पण आता इनर ईयर टॅटूचा नवीन ट्रेण्डही तुम्ही पाहा…

फॅशनची आवड असलेली तरुण पिढी फॅशनेबल दिसण्यासाठी कुठल्याही नवीन फॅशनचा प्रयोग करायला कचरत नाही. मग ती फॅशन करताना त्यांना कितीही त्रास झाला वा कितीही वेदना झाली तरी ते सहन करतात. अशीच एक फॅशन म्हणजे आपल्या शरीरावर टॅटू कोरणे… तुम्ही आतापर्यंत पाहिलंच असेल की आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तरुण मुलं आपल्या हाता-पायांवर, मानेवर, गळय़ाभोवती, पोटावर, कंबरेवर किंवा चेहऱयावरदेखील टॅटू कोरून घेतात.

तुम्ही आता तुमच्या शरीराच्या आणखी एका विशिष्ट ठिकाणी म्हणजेच तुमच्या कानावर टॅटू कोरून घेऊ शकता. आहे ना गंमत… मग तर तुम्हाला कामात ईयररिंग घालायचीही गरज पडणार नाही. मात्र टॅटू कोरून घेणं काही सोपं नाही आणि त्यासाठी तुम्हाला कितीतरी वेदनाही सहन करावी लागते पण ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है ना मेरे दोस्तों…’ मग कानाचं सौंदर्य वाढवण्यासाठी थोडी वेदना तर सहन करावीच लागते.

कानावर टॅटूच्या कोणत्या डिझाइन्स काढू शकता –

फूल आणि वेलींचा टॅटू -ही डिझाइन कानावर किंवा कानामागे काढून रंगीबेरंगी फूल आणि वेली घातली असल्याचा भास होईल इतकं मात्र नक्की…

जोकर डिझाइन – जोकरच्या डिझाइनचा टॅटू कोरून विनोदी वातावरण तयार करू शकता.

म्युझिकची डिझाइन – कानाच्या वरपासून खालच्या टोकापर्यंत म्युझिकचे शब्द कोरून आपली संगीताची आवड दाखवू शकतो.

मोरपंखाची डिझाइन – मोराच्या पंखाची डिझाइन काढून तुम्ही रंगीबेरंगी आनंदाची उधळण करू शकता.

बाहुलीची डिझाइन – कानाच्या खालच्या छिद्रावर छोटय़ा बाहुलीची रंगीबेरंगी डिझाइन काढू शकता. याशिवाय घुबड, भुंगा, फुलपाखरू, किडा किंवा झुरळीच्या  डिझाइनचे टॅटूही काढू शकता. हे नक्की. कारण ‘नया है यह…’

  • टॅटू कोरण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या…
  • टॅटू कायम अनुभवी आणि तज्ञ व्यक्तींकडून कोरून घ्या.
  • रस्त्यावरील  लोकांकडून कधीच टॅटू कोरून घेऊ नका.
  • टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी सुई आणि रंग निर्जंतुक आहे का, याची खात्री करून घ्या. नवीन सुई आणि नवीन रंगाचाच वापर करा.
  • रंगांमध्ये अपायकारक धातू मिसळलेले असतात. यामुळे त्वचेला सूज येणे, पल्स येणे, पुरळ उठणे, त्वचा लालसर होणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या