कपाळावर गोंदवल्यामुळे चोरी पकडली, जाणून घ्या सविस्तर

महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमात त्यांच्या हातावर लिहिलेले मेरा बाप चोर है. यानंतर तो संपूर्ण चित्रपटात हा डाग पुसण्यासाठी संघर्ष करताना दिसतो. ब्रिटनमध्ये असाच  एक चोर समोर आला आहे, ज्याच्या कपाळावर मी चोर आहे असे लिहिले होते आणि कदाचित त्यामुळेच तो पकडला गेला असावा.

वास्तविक, ही घटना ब्राझीलमधील चोराची असून रुआन रोचा दा सिल्वा असे त्याचे नाव आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाला पाच वर्षांपूर्वी सायकल चोरी करताना लोकांनी पकडले होते. त्यानंतर त्याला लोकांनी मारहाण करून त्याला पोलिसांच्या बोलावले होते. तसेच पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याच्या कपाळावर मी चोर आणि तोतया असल्याचे गोंदवले होते.

रिपोर्टनुसार, त्यावेळी हे प्रकरण त्यावेळी खूप चर्चेत आले होते. नंतर या चोराला सोडून देण्यात आले होते. आता या चोरट्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चोरटा नुकताच एका घरातून पुन्हा चोरी करताना पकडला गेला. चोरी करण्यासाठी तो बाथरूमच्या खिडकीतून घरात घुसला मात्र तो पकडला गेला.

या चोराला पकडल्यानंतर त्याच्या घरातील लोक त्याला पाहून हैराण झाले. त्याच्या कपाळावर मी चोर आहे असे लिहिलेले दिसले. पकडल्यानंतर यावेळीही त्याला पोलिसांच्या ताब्यात देतले.

रुआन या चोराच्या कपाळावर ब्राझीलच्या स्थानिक भाषेत गोंदवण्यात आले होते. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता त्याचा टॅटू काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले.