केजरीवाल यांच्या मंत्र्याची ३३ कोटींची संपत्ती जप्त

47

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भ्रष्टाचारमुक्त देशाचा नारा देत सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील एका मंत्र्याची ३३ कोटी रूपयांची संपत्ती आयकर विभागाने जप्त करून केजरीवाल सरकारला झटका दिला आहे.

दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सरकारातील मंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित अनेक कंपन्यावर आयकर विभागाने धाडी घातल्या आहेत. जैन यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि आरोग्य खात्याचा पदभार आहे. या कारवाईत अनेक कंपन्यांचे शेअर्स आणि १०० गुंठ्याहून अधिक जमीन जप्त करण्यात आली आहे. या मालमत्तेतील जमीनीची किंमत १७ कोटी आणि सर्व शेयरची मिळून एकूण किंमत १६ कोटी रूपये आहे. मात्र या मालमत्तेचा बाजार भाव जास्त आहे.

जैन यांच्याशी संबंधित इंडो मेटलिमपेक्स, अकिंचन डेव्हलपर, प्रयास इन्फोसोल्यूशन आणि मंगलायतन प्रोजेक्ट या चार कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कंपन्यांमधून रोख रक्कम घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने नोंद करून शेअर घेतल्याचा जैन यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. आयकर विभागाने इंडो मेटलिम्पेक्स या कंपनीशीसंबंधित ६९ गुंठे जमीन जप्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या