‘द कॉन्फरन्स ऑफ बर्ड्स’ची संगीतमय सफर

टीच फॉर इंडियाने ‘कॉन्फरन्स ऑफ द बर्ड्स’ या एका नावीन्यपूर्ण संगीतमय शोची निर्मिती केली आहे. यामध्ये श्रवणीय सुफी आणि हिप हॉप म्युझिक मुंबईकरांचे कान तृप्त करायला सज्ज झाले आहे.

 दहा वर्षांपूर्वी टीच फॉर इंडियाची पहिली सांगीतिका आली होती. तिचे नाव ‘माया’ होते. त्यामध्ये अनेक मुलांना टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. त्यामध्ये अभिनय केलेल्या खुशी आणि प्रियंका या मुली ‘कॉन्फरन्स ऑफ द बर्ड्स’मध्ये संगीताची जादुई सफर घडवणार आहेत. जणू काही या मुलींनी एक वर्तुळ पूर्ण केलंय. टीच फॉर इंडियाच्या यूटय़ूब पेजवर ‘कॉन्फरन्स ऑफ द बर्ड्स’ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.