शिक्षिकेने कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याचा कानाचा पडदा फाटला

148
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नालासोपारा

शिक्षिकेने कानशिलात लगावल्यामुळे एका आठवीत शिकाणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. या प्रकरणाची तक्रार त्या विद्यार्थ्याच्या आईने जवळच्या पोलिस ठाण्यात केल्यानंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली मात्र अवघ्या काही तासातच जामिनावर सुटकाही करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २ फेब्रुवारीला इतिहासाचा तास घेण्यासाठी शिक्षिका वर्गात आली. त्यादरम्यान इतिहासाचे पुस्तक न आणल्यामुळे तिने पाच ते सहा विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली असता वर्गाबाहेर काढलेली मुले मस्ती करत असल्याने तिने बाहेर येऊन विद्यार्थ्यांच्या हातापायांवर छडीने मारले. तसेच शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या जोरात कानशिलात लगावल्याने मुलाच्या कानातून रक्त येऊ लागले, असे विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिला अटकही केली मात्र वसईच्या सत्र न्यायालयाने तिची जामिनावर मुक्तता केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या