नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार, शिक्षकांच्या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती राहिली

प्रातिनिथिक फोटो

राजस्थानातील जोधपूरमधल्या एका शाळेत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला आहे. या विद्यार्थिनीला शिक्षक नापास करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत होता. ‘याबद्दल बोललीस तर नापास करेन’ असं या शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकावलं होतं. वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आल्याने ही मुलगी गर्भवती राहिली होती, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

मुलीची तब्येत बिघडल्याने तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेलं होतं. यावेळी मुलीला तपासल्यानंतर ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. यानंतर तिच्या घरचे प्रचंड हादरले होते. पालकांनी मुलीला शांत करुन यामागे कोण आहे, याची चौकशी केली. यावेळी मुलीने रडत रडत दोन शिक्षकांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. मुलीने आपली नावे घेतल्याचं कळाल्यानंतर हे दोनही शिक्षक फरार झाले आहेत. पोलिसांनी या दोघांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.

जोधपूरमधील बालेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातल्या शाळेत हा प्रकार घडला आहे. इथल्या शासकीय शाळेत ही मुलगी शिकत होती. या शाळेतील सिक्षक सुरजाराम याने विद्यार्थिनीवर मार्च महिन्यात शाळेतमध्येच 3-4 वेळा बलात्कार केला होता. सुरजाराम हे किळसवाणे कृत्य करत असताना त्याचा साथीदार सहीराम हा खोलीबाहेर उभा राहून पहारा द्यायचा. पीडीत मुलीने सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तिच्या वडिलांनी सांगितलं की मुलीला ताप आल्याने ते तिला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या