शिक्षकांचे पगार ऑफलाइनच

35

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेतकऱ्यांच्या कर्जापासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपर्यंत सर्व ऑनलाइन करण्यासाठी सरकारचा प्रयत्न सर्वच पातळ्यांवर फसला आहे. शिक्षकांचे पगार ऑनलाइन करण्याचा प्रयत्न वारंवार फसत असून पुन्हा एकदा ऑनलाइन यंत्रणा कोलमडल्याने शिक्षकांचे पगार ऑफलाइनच करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ऑनलाइन-ऑफलाइनच्या घोळात शिक्षकांचे पगार रखडले आहेत. दोन दोन महिन्यांचे पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा न झाल्याने शिक्षकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. ऑनलाइन यंत्रणा वारंवार कूचकामी ठरत असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार ऑफलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जुलैपर्यंतचे पगार ऑफलाइनने
या निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे, जून आणि जुलै महिन्याचा पगार ऑफलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. जानेवारीपासून कोलमडलेली ही ऑनलाइन यंत्रणा अद्याप सुरूच झालेली नाही. त्यामुळे आता जानेवारीपासून जुलैपर्यंतचे पगार ऑफलाइननेच होत असून आता ही ऑनलाइन प्रणाली पुन्हा सुरू होईल का नाही याबद्दल साशंकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या