मयांकचा द्विशतकी धमाका,हिंदुस्थानला 343 धावांची आघाडी

708

सलामीवीर मयांक अगरवालने नोंदवलेली 243 धावांची धावांची धडाकेबाज द्विशतकी खेळी आणि त्याला अजिंक्य रहाणे (86 ) ,चेतेश्वर पुजारा (54) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 60) यांची लाभलेली साथ यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 6 बाद 493 अशी मोठी मजल मारता आली.त्यामुळेच बांगलादेश विरुद्धच्या या पहिल्या कसोटीत 343 धावांची आघाडी घेऊन हिंदुस्थानी संघाने भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. या लढतीचे आणखी पूर्ण तीन दिवस बाकी असून लढत वाचवण्यासाठी पाहुण्या बांगलादेशला शर्थीची झुंज द्यावी लागणार आहे.

इंदूरच्या होळकर मैदानावर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर पुजारा 54 धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अगरवालने डाव सावरला. रहाणे 86 धावांवर बाद झाला, अग्रवालने मात्र दमदार द्विशतक ठोकले. मात्र द्विशतकानंतर तुफान फटकेबाजीच्या प्रयत्नात तो  243 धावांवर बाद झाला.त्याने 330 चेंडूंत विक्रमी  343 धावांची द्विशतकी खेळी साकारली.त्यात 28 चौकार आणि 8 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.अगरवाल -रहाणे जोडीने चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी साकारताना बांगलादेशी गोलंदाजीची अक्षरशः कत्तलच केली.रानहेचे शतक मात्र दुर्दैवाने हुकले. त्याने 172 चेंडूंत 86 धावांची शानदार खेळी केली.

जाडेजाचीहि तुफान फटकेबाजी
मयांक बाद झाल्यावर जाडेजाने तुफान फटकेबाजी केली. सध्या जाडेजा 60 तर उमेश यादव 25 धावांवर खेळत आहे. अष्टपैलू जाडेजाने 76 चेंडूंत नाबाद 60 धावांची खेळी केली आहे. त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांची नोंद केली आहे. पहिल्या दिवशी हिंदुस्थानी डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला होता. बांगलादेशकडून अबू जायेदने 4 तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी 1-1 गडी बाद केला.

  • काल पहिल्या दिवशीच बांगलादेशची पहिल्या डावात सर्वबाद 150 अशी घसरगुंडी उडाली.त्यामुळे आता हीं
    लढत वाचविण्यासाठी बांगलादेशला शिकस्तीची झुंज द्यावी लागणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या